About Us
राजनखेड गावाबद्दल थोडक्यात माहिती
आणी गावामध्ये खालील सुविधा उपलब्ध आहेत. या गावात दर रविवारी आठवडी बाजार भरत असून या बाजारात आजुबाजुच्या गावातील व्यापारी मंडळी व्यापारासाठी येतात.
गावाची ओळख व्हावी म्हणून गावाच्या प्रवेशाला स्वागत कमान बसविले आहे. बार्शिटाकळी मार्गे महागाव वरून येत असतानी छञपति शिवाजी महाराज प्रवेशवद्वार व पातुर मार्गे बोरमळी वरून येतानी श्री.संत सेवालाल महाराज प्रवेश द्वार आहे. तसेच दोन्ही गावामधे गुराना पाणि पिण्यासाठी हौद व कपडे धुण्यासाठी धोबी घाटची व्यवस्था ग्रा.प ने केलेली आहे.
राजनखेड या गावाची ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत स्वतंत्र असुन गावातील सर्व नागरिकांना वेळेवर सुविधा दिल्या जातात व सर्व प्रकारचे दाखले संगणीकृत दिले जातात. राजनखेड ग्रामपंचायतीमध्ये राजनखेड गांव व राजनखेड तांडा असे दोन महसुल गावे आहेत. त्यामध्ये राजनखेड गावाचे भौगोलिक क्षेत्र – २५८.८४ असुन ताड्याचे भौगोलिक क्षेत्र – ३६०.४६ ऐवढे आहे. गावाला लागुन जवळच धार्मिक स्थळ म्हणुन रुद्रायणी देवी चे मंदीर आहे. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असुन भुमिहीन लोक शेतमजुरी करतात.
राजनखेड गावाचा पिन कोड 444401 आहे. आणि येथील पोस्ट ऑफिस सुविधा गावामध्येच आहे. ग्रामपंचायतीचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ 619.30 हेक्टर आर ऐवढे आहे. राजनखेड गावाच्या शेजारी महागांव, पाटखेड, चिंचोली रुद्रायणी, बोरमळी शेलगांव चेलका, धाबा, पुनोती बु., मांगुळ अशी गावे असुन जवळील शहरांमध्ये पातूर, अकोला, मालेगोव, मंगरुळपीर, कारंजा या तालुक्याचा समावेश होतो. गावाच्या जवळील रेल्वे स्थानकांमध्ये लोहगड रेल्वे स्टेशन आणि बार्शिटाकळी रेल्वे स्टेशन आहेत. गावातील स्थानिक भाषा मराठी, बंजारा, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू आहेत.







