आपल्या ग्रामपंचायतीचा विकास – एकत्र पुढे
ग्रामपंचायत जनखेड़ आपल्या गावातील प्रत्येक नागरिकासाठी पारदर्शक व उत्तरदायी सेवा देण्यास कटिबद्ध आहे. स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि शिक्षणाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास हा आमचा ध्यास आहे.
राजणखेड का निवडावे
ध्येय
गावातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा, शिक्षण व स्वच्छता उपलब्ध करून देणे आणि पारदर्शक शासनाद्वारे सर्वांगीण विकास घडवून आणणे.
दृष्टीकोन
स्वच्छ, सशक्त आणि आत्मनिर्भर ग्राम उभारणे, जिथे प्रत्येक व्यक्तीच्या सहभागाने गावाचा विकास घडतो.
मूल्ये
प्रामाणिकपणा, पारदर्शकता, लोकशाही सहभाग आणि सामाजिक एकात्मता हाच आमच्या कार्याचा पाया आहे.





















राजणखेड विषयी
ग्रामपंचायत राजनखेड महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील एक गाव आहे. राजनखेड हे गाव बार्शिटाकळी ते पातुर रोडवर असुन सदर गाव बार्शिटाकळी तालुंक्या पासुन ०९ किलोमीटर आहे व अकोला जिल्ह्यापासुन २९ कि. मी. आहे. राजनखेड हे ०३२ मुर्तिजापुर या विधानसभा मतदार संघात असुन जांबवसु जिल्हा परिषद सर्कल मध्ये आहे. गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित राहतात त्यामधे (वंजारी, बंजारा, कुणबी, मराठा, मुस्लिम, न्हावी, मातंग, आदिवासी, इतर) परंतु गावामध्ये सामाजिक दृष्ट्या बंजारा व वंजारी (VJNT) समाजाची वस्ती जास्त आहे. या गावाची लोकसंख्या सन २०११ च्या जनगणने नुसार प्रमाणे स्त्रीया- १११४ पुरुष- ११३५ अशी एकुण- २२४९ आहे. महसुल गांव निहाय एक अशा प्रकारे दोन स्मशानभूमी गावामध्ये आहे. सर्वांकरिता सर्व मंदिरे खुले आहेत, गावात खाली सुविधा उपलब्ध आहेत. गावाला लागुन जवळच धार्मिक स्थळ म्हाणुन रुद्रायणी देवी चे मंदीर आहे.
राजणखेड विषयी
श्री. ईश्वरसिंग बाबूसिंग जाधव सरपंच मो. नं. 8805190149















